Crime Maharashtra Maharashtra Gov Suicide / Murder

अकलुज येथे निरा नदिच्या पात्रात बुडून दोन अल्पवयिन मुलांचा मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अकलुज- निरा नदिच्या पात्रात पोहण्यास गेल्या दोन अल्पवयिन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अकलूज शहरात घडली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकलूज येथील महर्षि कॉलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी (वय৭६), करण रणजित लांडगे (वय १४), अवधुत हिरा कांबळे (वय १५) व भैया जगन खंडागळे (वय १६) हे चौघे दुपारी निरा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले. घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शक्ती गवळी व करण लांडगे हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी केला. त्यांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावल्यानंतर महर्षिनगर परिसरातील अनेक तरूणांनी लगेच निरा नदीच्या घाटाकडे धाव घेतली. पोहणाऱ्यांनी तरुणांनी पाण्यामध्ये शोध घेतला असता, पाण्यामध्ये दोघेजण सापडले. हाता-तोंडाशी आलेली मुले अशी अचानक निघुन गेल्यामुळे शक्ती आणि करणच्या परिवाराचा शोक अनावर झाला होता. महर्षि कॉलनी परिसरातील शेकडो लोक यावेळी हळहळ करत होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com