Covid 19 Economy Health International Maharashtra Gov National Religious Technology

अखेर खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती ‎

hqdefault

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे पथक प्रमुख
सोलापूर- कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारले जातात का याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज भरारी पथकाची नियुक्ती केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे पथकाचे प्रमुख आहेत.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज भरारी पथकाच्या नियुक्तीबाबतचा आदेश जारी केला. या पथकात जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मोहन शेगर, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे सदस्य आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे लेखा आणि कोषाधिकारी महेश अवताडे सदस्य सचिव आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला असून ३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निर्णयांची प्रभावी आणि काटेकोरपणे  अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे दिले होते. त्यानुसार हे भरारी पथक नियुक्त केले आहे.

भरारी पथकांने खालील कामे करणे अपेक्षित आहे.
१) वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी.
२) खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी करावी.
३) खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी. आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.
#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com