महाराष्ट्रातील सोलापुरात पहिली घटना
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोना 10 हजाराचा टप्पा ओलांडला असताना अत्यावश्यक सेवेत वैद्यकीय सेवा न देणाऱ्या 11 डॉक्टर्स व 15 नर्सेस यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव सोलापूर आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंजूर केले आहे. आज हा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल आणि नर्सिंग कौन्सिलला पाठवणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी कळवले आहे. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियमांतर्गत नोंदणी रद्द करण्याच्या प्रस्ताव आज पालिका आयुक्तांनी काढले आहे. यापूर्वी काही कर्मचाऱ्यांवर सेवेवर हलगर्जीपणा करत गैरहजर राहिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे काही कर्मचारी आणि डॉक्टर हे सेवेवर हजर देखील झाले होते. परंतु दोन खासगी रुग्णालयातील 11 डॉक्टर आणि 15 नर्सेस या सेवेवर हजर झाल्याच नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सोलापूरात ही पहिली घटना असून संबंधितांवर कारवाई होणार का ? यावर सर्वांचं लक्ष वेधून आहे.
#solapurcitynews