पांढरकवडा येथील वाघिण
Maharashtra National

अखेर पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- वन विभागाकडून पांढरकवडा (यवतमाळ) येथील मानवी वस्तीमध्ये वावर वाढलेल्या T-T2C1 या वाघिणीस सुरक्षित पिंजराबंद करण्यात आले आहे. या वाघिणीस गोरेवाड़ा (नागपूर) प्राणी बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यात येत आहे. ही वाघीण पूर्णतः स्वस्थ व सक्षम आढळल्यानंतर जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यवाहीवर स्वतः लक्ष ठेवून होते व वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. या कार्यवाहीत भाग घेतलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांचे मी आभार मानतो व कौतुकही करतो. वाघीण आणि नागरिक या दोघांनाही सुरक्षित ठेवण्यास वन विभागास यश आले आहे असेही वनमंत्री राठोड म्हणाले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com