fbpx
67221088 676587322816962 4958790114055553024 n 202009493331 अखेर सोलापूरतील या नगरसेवकाला हैदराबाद मध्ये अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूरातील न्यू पाच्छा पेठ कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. पोलिसांना पाहून इमारतीमध्ये मटका घेणारे व अन्य कर्मचारी यांच्यामध्ये पळापळ होत असताना त्यात एका हिशोबनिसचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सदर मटका प्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य सूत्रधार व भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याला अखेर सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथे अटक केली. त्याला सोलापुरात आणण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान मटका प्रकरणी मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्यासह ४० जणांविरुद्ध प्रथमता गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये मटका बुकी सह मटका एजंट लाईनमन मिळून २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या एक महिनांभरापासून नगरसेवक सुनील कामाठी याचा शोध घेतला जात होता मात्र तो कुठेही आढळून येत नव्हता. तो हैदराबाद येथे राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मंगळवारी रात्री समजली होती. रात्रीतून पोलिसांनी हैदराबाद गाठून नगरसेवक सुनील कामाठी याला अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. मटक्यातील मुख्य सहा भागीदारांपैकी पुतण्या आकाश कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी, सुरज कांबळे, इस्माईल मुचाले, शंकर धोत्रे या भागीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. सध्या इस्माईल मुच्याले व सुरज कांबळे हे दोघे पोलीस कोठडीमध्ये आहेत. सदर चौकशी सुरू असून सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update