Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूरात पावसाने काल रात्रीपासूनच सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जिल्हाप्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. सोलापूरतील सर्वात मोठी नाला म्हणजे कुंभारवेस परिसरतील नाला आहे. पावसाळ्यात सर्वच बाजूने पाणी या नाल्या मार्फत पुढे जाऊन मिळतो. आज हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्यातील परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. परंतु तत्पूर्वीच नाले भरून रस्त्यावर वाहताना दिसत होते. एकंदरीत जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. परंतु काही वर्षांपूर्वी अर्धवट बांधलेला नाला अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिक संतापले आहेत. एकीकडे स्मार्टसिटीचा गाजावाजा तर दुसरीकडे निधी अभावी अर्धवट पडलेले नाले दुरुस्ती काम पाहता आपत्कालीन विभाग झोपी गेल्याचे दिसत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोलापूरात पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांचे ऑडिट करून दुरुस्ती देखभालसाठी आजवर कोणतीच समिती गठित झाली नाही. यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. येणाऱ्या काळात स्मार्ट सिटी म्हणून सज्ज होताना दुसरीकडे नाले मात्र उघडेच का ? या वर प्रशासन मात्र गप्प आहे. नाले सफाई व दुरुस्ती वर भर दिले असता अतिवृष्टी काळात पाणी साचले नसते हे मात्र नक्की.