Environment

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनाचे औचित्य साधून चिंचोली काटी येथे वृक्षारोपण

IMG 20200806 WA0031

सोलापूर/(शिवाजी सावंत) प्रतिनिधी- अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनाचे औचित्य साधून चिंचोली काटी येथे वृक्षारोपण मोठ्या उत्साहाने पार पडले. चिंचोली काटी येतील धर्मराज मंदिर परिसरात सुमारे 50 वेगवेगळी झाडे लावण्यात आली यामध्ये अशोक, बहावा, करंज, चिंच, सिल्वर ओक,गोलमोहर इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली.अश्या मंगल प्रसंगी वृक्षारोपण करून चिंचोली काटीतील तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीमुळे गेल्या 2 दशकापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे त्यामुळे हा परिसरात दूषित हवेमुळे प्रदूषित झाला आहे,हाच विचार करून गावातील काही तरुण सामाजिक कार्याची आवड असलेल्या तरुणांनी हा अभिनव उपक्रम राबवला आहे.आणि साहजिकच आज हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाचा सुवर्ण क्षण येथील तरुणांनी अश्या पद्धतीने साजरा केला.प्रभू श्रीरामचंद्र कि जय या शुभनामाने परिसर दणाणून गेला होता.यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे प्रत्येक झाड हे जगेलच असा सुर या तरुणांमधून ऐकायला मिळत होता.या झाडांची निगा राखण्यासाठी एखादा माळी काम करणारा व्यक्ती पूर्णवेळ देण्याची मागणी ग्रामपंचायत चिंचोली काटी कडे करण्यात आली आहे.
यावेळी अविनाश कोळी , पत्रकार शिवाजी सावंत चकोर नागणे, रोहित पाटील, पृथ्वीराज पवार, गणेश आलदार, प्रशांत परीट,बापू भोसले, राजाराम धोत्रे, शिवाजी मडोळे, कोंडीलाल शेख आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com