fbpx
images 2 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या- जिल्हाधिकारी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीबरोबर त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अल्पसंख्याक सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रशासन अधिकारी कादर शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक चाँदमिया बिराजदार, मनपाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकास, पोलीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मनपामध्ये शिष्यवृत्तीसाठी 7344 नोंदणीकृत विद्यार्थी असून 3408 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे झाकीर हुसेन मदरसाचे पाच प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आले असून 38 मदरसे जिल्ह्यात आहेत. मात्र ते अनुदान घेत नसले तरी त्यांनी विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. त्याठिकाणी संगणक, लॅब, टॉयलेट, बाथरूम आदी सुविधांची तपासणी करून कारवाई करा. व्यायामशाळा, खेळाचे साहित्य, विद्यार्थी संख्या वाढविणे, वसतीगृह उभारणीवर भर देण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी केल्या. देशमुख यांनी पोलीस भरती, वसतीगृह अनुदान, कर्ज प्रकरणे, ॲट्रॉसिटी याबाबत मार्गदर्शन केले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या- जिल्हाधिकारी

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update