Solapur City News
National शेतकरी

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली- शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशा सूचना कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.

sangli 2

पंचायत समिती जत येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

              ते पुढे म्हणाले, कोरानाचा संसर्ग वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण करून काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी मिरज तालुक्यातील आरग, लिंगनूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, जत तालुक्यातील कुडनूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतिपिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना दिलासा दिला. कवठेमहांकाळ येथे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी प्रसंगी आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या. तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार व कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com