गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या महात्मा गांधी यांच्या स्वप्नानातील भारत ह्या ऑनलाइन निबंध स्पर्धेचे सन्मानपत्र वितरण समारंभ कोरोना विषयक सरकारच्या नियमांचे पालन करुन संपन्न
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- भारतातच्या स्वातंत्र्य लढ्या दरम्यान १९२० साली प्लेग ह्या महामारीने रौद्र रूप धारण केले होते, त्याकाळी महात्मा गांधी यांनी त्यांच्या समाजप्रबोधन लेखणीतुन भारतीय जनतेला स्वच्छतेचे आणि आरोग्याचे महत्त्व विशद करुन दिले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या कोरोना महामारीतही तितकेच उपयोगी पडत आहे, असा विश्वास गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.
गिरिकर्णिका फाऊंडेशनद्वारा आयोजित गांधीजींच्या स्वप्नानातील भारत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतचे सन्मानपत्र वितरण समारंभ कोरोना विषयक सरकारच्या नियमांचे पालन करुन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन एकुण ८१० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील उत्कृष्ट निबंध लिहुन पाठवणाऱ्या सोलापूरातील स्पर्धकांना गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि राज्यातील इतर शहरांतील विजेत्यांना तपालाद्वारे सन्मानपत्र पाठवण्यात आले.
महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार नव्या पिढी मध्ये व्हावा आणि त्यातुन समाजातील सर्व घटकांना देशकार्यासाठी प्रेरणा मिळावी हेच ह्या निबंध स्पर्धेचे मुख्य हेतु होता. उत्कृष्ट निबंध लिहिणार्या स्पर्धकांची नावे : अनंत गडगे, समर्थ स्वामी, प्रतिक्षा किणगी, पल्लवी कंदीकटला, शिवानी गोटे, शिवरत्न वडणे, चंद्रकांत ईश्वरकट्टी, डॉ.मोनिका जिंदे. सदर स्पर्धेचे परिक्षण कोलकाता येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मनस्वी चॅटर्जी यांनी केले.उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ची शपथ घेतली आणि शासनाच्या कोरोनामुक्त कार्यक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.