fbpx
m s28

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात आज 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ होणार असून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची  जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्व पथकांना साहित्याचे वाटप केल्याची माहितीही शंभरकर यांनी दिली.

                        मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. प्रत्येक गावात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य पथकांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आरोग्य पथकाला सर्व साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी करणार आहे. या पथकाला माहिती देऊन सहकार्य करावे. हे पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

               मोहिमेंतर्गत वैयक्तिक आणि संस्थांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनो कोणताही आजार लपवू नका. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, आरोग्य पथकाला संपूर्ण माहिती देण्याचे आवाहनही शंभरकर यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update