Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राह
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पतीचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे दुःख न पहावल्याने पत्नीने आपल्या जुळ्या मुलगा आणि मुलीसह धारदार वस्तूने दोनही हाताच्या नस कापून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. समीना रुस्तुम शेख(42) आणि आयेशा रुस्तुम शेख (17) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नाव आहेत. या घटनेत समीर रुस्तुम शेख बचावला आहे. या मध्ये मायलेकीचा मृत्यू झाला असून मुलगा वाचला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही खळबळजनक घटना उस्मानपुरा भागातील न्यू गणेशनगर मधील स्वामी समर्थ नगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पतीचे कोरोनामुळे सहा दिवसापूर्वी निधन झाले. ते उपचार घेत होते तेव्हा रुस्तुमच काही बरेवाईट झाले मीही मुलाबाळांसह आत्महत्या करेल, असे समीना नातेवाईकांना बोलायची असे त्यांच्या बहिणीने माहिती दिली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.