Solapurcitynews
Education/Collage/School Sports

क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – पालकमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा, जिल्हा क्रीडा संकुलाचे काम व इतर प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. येथील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह क्रीडा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, क्रीडा संकुलात आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करावी.  तालुका क्रीडा संकुले, तेथील आवश्यक कामे याचेही सादरीकरण करावे. जिल्हा क्रीडा संकुलाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासंबंधी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल.

           पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम, शूटिंग प्रॅक्टिस सेंटर, स्क्वॅश सेंटर,  डान्स अँड फिटनेस अकॅडमी, टेबल टेनिस क्लास, ग्राऊंड स्टेडियम आदींना भेट देऊन पाहणी केली व विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी आर्चरी रेंजलाही भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशीही संवाद साधला व त्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com