fbpx
cm pahani 605x375 1 गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा अपडेट राहा

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.  तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.

 

cm ganesh murti गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक

अशा रीतीने फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यानंतर के पूर्व विभाग विलेपार्ले येथील पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाची देखील पाहणी केली तसेच सूचना दिल्या.

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update