fbpx
रुग्णवाहिका लोकार्पण 1 750x375 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

 मालेगाव- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांची वेळेवर ने-आण करण्यासाठी  रुग्णवाहिकांची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांची गरज ओळखून व रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी व त्यांची गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात 30 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक रुग्णवाहिका (फोर्स ट्रॅव्हलर कंपनीची) मालेगाव शहर व तालुक्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिनी उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज मालेगाव येथे राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे याच्या हस्ते करण्यात आले.

              रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी मंत्री भुसे म्हणाले की, गरजू व गरजवंत रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा. असे आवाहन करत रुग्णवाहिकेचे नियोजन बघणारे राजू आलीझाड व संदिप मोरे यांना रुग्ण वाहिकेच्या चाब्याही यावेळी सुपूर्त करण्यात आल्या.

             रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी मालेगाव महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, प्रभाग 1 चे सभापती नगरसेवक राजाराम जाधव, नगरसेवक भिमा भडांगे, तालुका प्रमुख संजय दुसाणे, राजेश गंगावणे, विनोद वाघ, प्रमोद शुल्का आदि पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update