Industrial minister subhash desai 711x375 1
National

गोरेगावमध्ये अत्याधुनिक आयसीयू कोविड सेंटरचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- गोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरात २२४ खाटांचे सुसज्ज असे आयसीयु, एचडीयु कोविड रुग्णालय उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोविड रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे या केंद्रात सुविधा मिळतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असे आयसीयु, एचडीयु, डायलिसीस रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या कोविडसेंटरमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, विविध प्रकारचे व्हेंटिलेटर, प्रत्येक बेडसोबत मल्टी पॅरा मॉनिटरची सुविधा देण्यात आली आहे. सर्व बेड्स सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टमला जोडलेले आहे.

             नेस्को सेंटरमध्ये उभारलेल्या नव्या केंद्रामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडस्, आयसीयु बेड्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्यावतीने या केंद्राला सर्व सहकार्य केले जाईल, असे  देसाई म्हणाले. या केंद्राच्या प्रमुख डॉ. निलीमा आंद्रादे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com