IMG 20200917 WA0012
Covid 19 Solapur City

घाबरण्याचे कारण नाही; सर्वांनी टेस्ट करून घ्या- सुरेश पाटील

सुरेश पाटील यांची स्व्याब रिपोर्ट निगेटिव्ह

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

20200919 173045सोलापूर- वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना कोरोना लागण झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. दिनांक 14 व 15 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचे धाबे दणाणले असून त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचारी, लोकप्रतिनिधी पत्रकार बंधूंनी ही टेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले होते. नगरसेवक गणेश पुजारी यांचाही ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता सर्वांनी आपली आणि परिवाराची काळजी घ्यावी. अद्याप तीन दिवस उलटून ही त्यांच्या समवेत असलेल्या काही लोकप्रतिनिधी व मित्र मंडळी वगळता उर्वरीतांची टेस्ट झालीच नाही.

                   आरोग्य अधिकारी अद्याप यादी घेऊन सर्वांची टेस्ट करण्यास सुरू केले आहे. परंतु एखाद्या व्यक्तीस जर कोरोना लागण झाल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन व्हावे लागते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून संपर्कातील आलेल्या व्यक्ती व लोकप्रतिनिधी क्वारंटाइन झाले नसल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही सभेत ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक ही उपस्थित होते. सुरेश पाटील यांची आजवर दोन वेळा रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि एकदा स्व्याब चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.

4yWU2OXmसंपर्कातील नागरिक व लोकप्रतिनिधींना आव्हान
आमच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि पत्रकार बंधुंना मी आवाहन करतो की, सभेमधील उपस्थित असलेल्या सर्वांनी टेस्ट करून प्रशासनाला सहकार्य करा. गटनेते आनंद चंदनशिवे आणि नगरसेवक गणेश पुजारी यांच्या संपर्कात आल्याने मी 3 वेळा टेस्ट केले आहे . माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी अद्याप टेस्ट केले नाही त्यांनी लवकरच न घाबरता टेस्ट करावे. अद्याप संपर्कातील कोणत्याही लोकप्रतिनिधिनी क्वारंटाइन झाले नाहीत. याबाबत मी माहिती घेऊन कळवतो.
सुरेश पाटील- नगरसेवक, माजी सभागृह नेते

20200919 172120

 

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com