fbpx
Minister Shri Vadettiwar Photo 1 750x375 1 चेंबूर येथील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल महिनाभरात सादर करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- मौजे-चेंबूर या शासकीय जमिनीवर ३४ इमारतींचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे. उर्वरित १२ इमारतीसंदर्भात शासनाची परवानगी न घेता ज्या बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे, ते तातडीने थांबविण्यात यावे. या कामांचा अहवाल एक महिन्याच्या आत तातडीने सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात मौजे वाडवली भूखंड क्रमांक २७ अ, ब, तसेच 1729 या शासकीय मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आहे.

      मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सर्वे क्रमांक २९ व ३० येथील इमारती पाडून पुनर्वसनाचे काम करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असताना, तसे न केल्याने संबंधित पुनर्वसनाचे काम तातडीने थांबविण्यात यावे. उर्वरित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून तातडीने सादर करावे. परिसरातील अनधिकृत झोपडपट्टयांसंदर्भातीलही अहवाल सादर करावा. सर्व संबंधित कामांचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

       या बैठकीस तहसिलदार वंदना माकू, कुर्लाचे तहसिलदार संदिप थोरात, मुख्य प्राधिकरण अधिकारी पंकज देवरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM चेंबूर येथील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल महिनाभरात सादर करा

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update