fbpx
Jambo Covid 750x375 1 जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे येथील जम्बो कोविड रुग्णालयातील सोयीसुविधांचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे- कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम तसेच इतर सर्व आवश्यक त्या सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.

             शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. सुभाष साळुंखे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यांनी जम्बो रुग्णालयातील सोईसुविधांची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाकडून सुरु असलेल्या उपचाराबाबत विचारपूस केली.

             आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे, जम्बो रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या एकूण खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी तसेच कोविडसोबतच इतर आजार असलेल्या रुग्णांवरही उपचार होण्यासाठी प्रत्येक आजारातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच कोरोनासोबतच इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

              कोरोना आजारामध्ये सीटी स्कॅन तपासणी महत्त्वाची असल्याचे सांगतानाच या तपासणीसाठी जम्बो रुग्णालयात मोबाइल सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच राज्यात सर्व ठिकाणीच सीटी स्कॅन सुविधा उपलब्धतेबाबत निर्देश देण्यात आले असून सीटी स्कॅनचे दरही निश्चित करण्यात येतील. कोरोना उपचार सुविधा सुलभ होण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याच्या सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. नातेवाईकाला रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी समाधान व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जम्बो रुग्णांलयातील सुविधेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बाणेरच्या कोविड रुग्णालयाचीही केली पाहणी
बाणेर येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील सोईसुविधांचीही आरोग्यमंत्री टोपे यांनी पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त जयदीप पवार यांनी रुग्णालयातील सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर उपस्थित होते. बाणेरच्या कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची टाकी, ऑक्सिजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, शेड व कॉम्प्रेसर, व्हॅक्यूम पंपची व्यवस्था आदी सुविधांचीही पाहणी केली.

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update