fbpx
Jaswant Singh

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना तीव्र दुःख

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जसवंत सिंह यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. प्रखर देशभक्त, अभ्यासू व प्रभावी वक्ते असलेल्या जसवंत सिंह यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ व परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांची संसदेतील व संसदेबाहेरील अभ्यासपूर्ण भाषणे व वक्तव्ये आवर्जून ऐकली जात. श्री. जसवंत सिंह यांचेशी माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक जागतिक दर्जाचा मुत्सद्दी व राजनीतिज्ञ गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांचे चिरंजीव मानवेंद्र सिंह व इतर परिवारजनांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update