Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या दाम्पत्यांचा एक संग्रह काढून त्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जागृती पब्लिकेशनच्या वतीने देण्यात आली आहे. पती – पत्नी दोघेही डॉक्टर, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वकील, इंजिनिअर, साहित्यिक-कवी, राजकारणी, बिझनेसमन, एकाच समाजकार्यात, एकाच कलाक्षेत्रात किंवा एकच छंद जोपासणारे पती- पत्नी अशा दाम्पत्यांच्या कार्याची वाटचाल सांगणारा, त्यांच्या कार्याला सलाम करणारा हा प्रेरणादायी संग्रह काढण्यात येणार आहे. तसेच त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव देखील करण्यात येणार आहे. जागृती पब्लिकेशन गोडीने करणार जोडीने कार्य करणार्या दाम्पत्यांचा गौरव, अशी माहिती जागृती पब्लिकेशनचे सहसंचालक सोमनाथ गायकवाड यांनी दिली. अधिक माहितीसाठी आणि नावे नोंदवण्यासाठी ८९७५७६८३५२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#solapurcitynews
जाहिरात-
(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)
जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143