आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडून नागरिकांच्या धान्याची नुकसान
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर(सुनिल कोडगी)- सोलापूरतील भवानी पेठेत रास्ताभाव धान्य दुकान ब 5 या दुकानाची रविवारी सकाळच्या सुमारास घरमालकाने दुकान पडल्याची घटना पुढे आली आहे. एकीकडे कोरोना महामारीसाठी रेशन दुकानदार जनतेच्या हक्काच्या धान्याची पूर्तता करत असताना दुसरीकडे जागेच्या वादातून दुकान पडल्याची घटना भवानी पेठेतील भाजीमार्केट येथे घडली आहे.
यापूर्वीही मालकाने दोन वेळा पडण्याच्या प्रयत्नात असताना दुकानदाराने डाव हाणून पाडत जनतेला हक्काचे धान्य वाटप करत होते. परंतु रविवारी सकाळी त्या दुकानावर काही कामगार येऊन भिंत पाडत दुकानाचे व धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सदरची माहिती कळताच काशीनाथ कोरे यांनी जवळच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पुन्हा सायंकाळी सहाच्या सुमारास पाडकाम सुरू केल्याने लाखो रुपयांचा धान्यावर आता पाणी फेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या प्रति व्यक्तीस गहू आणि तांदूळ मंजूर झालेले धान्य व नियमित घेणारे धान्य साठ्यावर दगड, माती व पाणी पडून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू असल्याने नागरिकांना मात्र आता धान्य मिळणार की नाही याबाबत साशंका आहे.
बांधकाम इमारत कायद्याअंतर्गत बांधकाम पडायचे असतील तर आगोदर रीतसर नोटीस व स्वतः पडणार की पालिका पाडणार यावर शिक्कामोर्तब होतो. परंतु सोलापूर मनपा ने नोटीस उत्तर देण्यासाठी ऑर्डर काढली असता थेट मालकाने दुकानाचे दोन भिंत परस्पर पाडले आहे. एकूणच 62 वर्षापासून या जागेवर कोरे यांचे अस्तित्व असल्याचे सांगत आहे व कोर्टात आम्ही प्रकरण टाकलो आहोत अशी माहिती काशिनाथ कोरे यांनी दिले आहे. मग पालिकेने पाडकाम नोटीस काढले तर सायंकाळी सहा वाजता कर्मचारी कसे पाडण्यास सुरू केले? रीतसर नोटीस न देता थेट कोणत्या अधिकाऱ्याने रेशन दुकान पाडण्यास परवानगी दिली? आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानावर झालेल्या गैर प्रकाराबाबत कोण जबाबदार? अशी एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा व कायदा सुव्यवस्था पालन न केलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी दुकानदाराने केली आहे.
सोलापूर महानगर पालिकेने काढलेल्या धोकादायक इमारती बाबत कोणते आदेश काढले ते पहा