Covid 19 Solapur City

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’मोहिमेची शपथ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करून या जनजागृतीबाबत आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ची शपथ दिली.

             यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, अरूणा गायकवाड, अनिल कारंडे, प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वत: माझ्या कुटुंबात, परिसरातील लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टीसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार किंवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने व सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी शपथ देण्यात आली.

यावेळी शंभरकर म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध कसा करायचा हे सर्वांना माहित झाले आहे. मात्र आपण दुसऱ्याशी भेदभाव न ठेवता कसे वागावे, याची जाणीव या शपथेमधून होते. आपण स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याशी सौजन्याने वागण्याची जाणीव सहकारी आणि कुटुंबियांना करून द्यायला हवी.

            ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्य पथक प्रत्येकाचे घरी दोनवेळा येऊन माहिती घेणार आहे. सर्वांनी पथकाला सहकार्य करावे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. आरोग्य पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार याविषयीची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिलांनी स्वत:बरोबर घरातील महिलांची काळजी घ्यावी. महिलांच्या समस्या वेगळ्या असल्याने त्यांच्यामध्ये या मोहिमेमधून जागृतीचे काम होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com