fbpx
banner marathi डॉ.आंबेडकर नगर, कफ परेड येथील अनधिकृत झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई- मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. डॉ. आंबेडकर नगर येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई विरोधात घर बचाओ घर बनावो आंदोलन या सामाजिक संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.

                या तक्रारीच्या अनुषंगाने मानवी हक्क आयोगाने या अतिक्रमण झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची सूचना केली होती. या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तर अपर मुख्य सचिव वने,उपसंचालक म्हाडा, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन कक्ष) व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर हे सदस्य म्हणून काम करणार आहेत. सदर समिती झोपडपट्टीधारक यांच्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची कागदपत्रे तपासणे, पात्रता ठरवणे व पुनर्वसनासाठी शिफारसी करणे याबाबत कार्यवाही करणार आहे, अशी माहितीही मंत्री राठोड यांनी दिली.

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 डॉ.आंबेडकर नगर, कफ परेड येथील अनधिकृत झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update