Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
अमरावती- रामा येथील अंगणवाडी सेविका दिवंगत उषा पुंड या साथीच्या काळात अखेरपर्यंत कार्यरत राहिल्या. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल व मीही स्वत: एक कुटुंबीय म्हणून या सर्वांच्या पाठीशी आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज रामा येथे सांगितले.
कोरोना संकटकाळात अंगणवाडी सेविका, आशा सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता उपाययोजनांसाठी अविरत योगदान देत आहेत. या कार्यात आपली सेवा देत असताना दुर्देवाने उषा पुंड यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल. यावेळी पालकमंत्र्यांनी श्रीमती पुंड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले व दिलासा दिला.