Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सोलापूरचे नगरसेवक नागेश वल्याळ व सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष्पदी नगरसेविका अश्विनी चव्हाण यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटिल यांनी केली आहे. सोलापूर महाराष्ट्र राज्यातील नगरसेवकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र या संघटनेची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रात या संघटनेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बांधणीला सुरूवात झालेली आहे. हि संघटना पक्षविरहीत आहे. या संघटनेचे ठाणे आणि पुणे येथे मुख्य कार्यालय आहे. नगरसेवक नागेश वल्याळ हे सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. भाजप माध्यमातूनही त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तर अनेक’ ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याबरोबरच अनेक समस्याही सोडविल्या आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन महिलांसाठी केले आहे.
नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक नागेश वल्याळ यांनी व्यक्त केली आहे.