3First 20Women 27s 20Residential 20Medical 20College 20in 20Pune
Education/Collage/School

नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व पदव्युत्तर संस्था सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करा

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई-  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना आज दिले.

             महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. कैलास शर्मा, रिलायन्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुस्ताद डावर यांच्यासह विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ कामकाजाचे सादरीकरण, तसेच विद्यापीठाचे प्रस्तावित पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय,आयुर्वेदिक, होमियोपॅथी महाविद्यालयांना स्थापनेच्या अनुषंगाने आढावा आणि सादरीकरण तसेच विद्यापीठाने कोविड -19 च्या अनुषंगाने विद्यापीठाने केलेली कामे याबाबत आढावा घेण्यात आला.

              वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी आकृतिबंध मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यापीठाच्या निधीतून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे तयार करू शकते का, विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र चालविण्यासाठी राज्य शासनाने जमीन देणे,विद्यापीठ डॉक्टरांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अनुज्ञेय ब्रुहत आराखडा तयार करण्यात यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी, नर्सिंग, व्यावसायिक थेरपी महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्याबरोबरच राज्य शासन वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयाचे आरोग्य विज्ञान शिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल कसे होईल, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण कशी करता येईल याबाबत अहवाल तयार करावा असे निर्देश दिले.

                   राज्यस्तरीय मान्यताप्राप्त महाविद्यालयासाठी रेटिंग दिले जाऊ शकते का, विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन सेवा सुविधा कशा देता येतील, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा कसा काढता येईल, शारीरिक अपंग विद्यार्थ्यांना काय वेगळ्या सेवा देता येतील, विद्यापीठ संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करता येईल याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना अहवाल करण्यास सांगितले.

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com