fbpx
covid 19 नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

भंडारा- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येणारे काही दिवस जागरुक राहणे आवश्यक आहे. लोकांच्या मनात भीती असून प्रशासनाने ही भीती दूर करण्यासाठी जागृती मोहीम राबवावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. कोविड19 सह विविध विषयाचा आढावा यावेळी घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार पुढील काही दिवस कोरोना रुग्ण दर वाढता असणार आहे.  याबाबत प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखाव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. मृत्यू संख्या कमी करण्यासाठी आराखडा तयार करावा असे ते म्हणाले. कोविड19 व बेड उपलब्धतेची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासोबतच लोकांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

                 खासगी रुग्णालयात अवाजवी देयक आकारल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून नागरिकांची लूट करणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. देयकाची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी यांच्या सोबत पोलीस अधिकारी यांची तपासणी टीम तयार करण्यात यावी. अवाजवी देयक आकारणी करणाऱ्या रुग्णालयाकडून अतिरिक्त आकारलेले पैसे रुग्णास परत मिळवून द्यावे असे ते म्हणाले. प्रसंगी रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, असे नाना पटोले यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update