Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
धुळे- कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी चांगली कामगिरी बजावल्याने कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. या पुढे सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना न्याय देण्याची भूमिका बजवावी, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकचे काम तातडीने पूर्ण करावे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध झालेले डायलिसिस मशीन तत्काळ सुरू करावेत. मर्चंट बँकेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सहकार व पोलिस विभागाने पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करीत सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा. आदिवासी विकास विभागाने अमृत आहार योजनेंतर्गत दिला जाणारा आहार सकस राहील, अशी दक्षता घ्यावी. तसेच वसतिगृह, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कृषी विभागाने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावेत. वीज वितरण कंपनीने जोडण्या तातडीने जोडाव्यात. या विभागाच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सादर करावी. याबाबत ऊर्जा मंत्री यांच्याकडे स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल.