Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
भंडारा- कोविड-19 या आजाराची तपासणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. आरबीएल बँकेच्या सौजन्याने तयार करण्यात आलेली ही आरोग्य तपासणी व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची कोरोना तपासणी करणार आहे.
या आरोग्य व्हॅनमध्ये एक डॉक्टर व त्यांची टीम असणार आहे. पल्स ऑक्सिमिटर, ताप तपासणी यंत्र व मेडिसीन या व्हॅनमध्ये उपलब्ध असेल. ताप तपासणे, रक्तदाब तपासणे, मधुमेह तपासणी आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांना अगदी मोफत औषधी देण्याची व्यवस्था या व्हॅन सोबत आहे. गंभीर आजार असलेल्या रूग्णांना संदर्भीय सेवा सुद्धा देण्यात येईल. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या विनंती वरून एचडीएफसी बॅंकेतर्फे सुविधायुक्त अशीच आणखी आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅन जिल्ह्याला लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे कौस्तुभ भुतडा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटला व विनय चौधरी यावेळी उपस्थित होते.