Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने वैशाली गुजर ,काशिनाथ माळगोंडे ,राजश्री स्वामी यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार तर गुरुबाळय्या स्वामी यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून मोजक्या व निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात संस्थाध्यक्ष श्री अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्राथमिक विभागातून वैशाली गुजर ( राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा, विनायक नगर), माध्यमिक विभागातून काशिनाथ माळगोंडे (नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, निलम नगर), महाविद्यालयीन विभागातून राजश्री स्वामी (नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय,निलम नगर), शिक्षकेतर कर्मचारी विभागातून गुरुबाळय्या स्वामी ( राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला, विनायक नगर) यांची निवड करण्यात आली आहे.गुजर,माळगोंडे, स्वामी हे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे व संस्थेच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्राचे व संस्थेचे नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर होत असल्याचे संस्था सचिव रविशंकर कुंभार व प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांनी सांगितले .कुंभार समाजातील गुणवंतांचा सत्कार
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाजातील इयत्ता दहावी व बारावी मधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे उर्वरित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना घरपोच रोख रक्कम शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे सचिव रविशंकर कुंभार यांनी सांगितले.
#solapurcitynews
जाहिरात-
(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)
जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143