Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देऊ
पंढरपूर- पंढरपूर येथे भीमा नदीला आलेल्या शहरातील पूर भागाची पाहणी केली.दरम्यान कुंभार घाट येथील नवीन बांधण्यात आलेला घाट कोसळून अभंगराव कुटुंबातील मरण पावलेल्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली या वेळी शासनाकडून सर्वोत्परी मदत करण्याचे अश्वासन दिले.
यावेळी आ.भारत भालके यांनी शहरातील पूरग्रस्त भागामध्ये स्वता: होडी चालवत पूरपरिस्थतीची पाहणी केली.पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन अडकलेल्या लोकांना निवाऱ्याची व्यवस्था तसेच जो पर्यंत पूर स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत पूरग्रस्तांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करुन दिली. यावेळी आलेल्या महापुरामधे बाधित झालेल्या कुटुंबियांना गतवेळी प्रमाणे भेदभाव न करता सर्व पूरग्रस्त बाधितांचे पंचनामे करून योग्य ती शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी संबधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोरकर साहेब तसेच शहर चे पीआय पवार साहेब यावेळी पंढरपूर शहरातील नगरसेवक, माजी नगरसेवक, जेष्ठ नागरिक तसेच पंढरपूर शहरातील सर्व सहकारी, पक्षाचे अध्यक्ष उपस्थित होते.