minister aaditya thackerays aare visit 750x375 1
Environment Maharashtra Maharashtra Gov

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त भांगे आदी उपस्थित होते.

aare visit

त्याचप्रमाणे मंत्री ठाकरे यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकारी यांच्या समवेत मालाड (वेस्ट) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com