Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पंढरपूर- पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक यांची आज निवड करण्यात आली. दिवंगत चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडप्रक्रिया संपन्न झाली. ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदाची गुरुवारी सकाळी 11 वाजता निवडप्रक्रिया संपन्न झाली. यावेळी कारखान्याच्या सर्व संचालकांनी तसेच व्हा. चेयरमन वसंतराव देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांनीच चेअरमन व्हावे. सुधाकरपंतानंतर कारखान्याची धुरा आ. प्रशांतराव यांनीच सांभाळावी. अशी भावनिक विनवणी केली. त्यानंतर निवड प्रक्रियेतील कायदेशीर बाबी पूर्ण करून चेअरमन पदासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निर्देशित करण्यात आले. यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली.