aaditi 750x375 1
Education/Collage/School

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन  काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सध्या हे सगळे वेळापत्रकच बदलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  स्वच्छता, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्य, आहार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे क्रीडा राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी संगितले. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, पिरंगुट, पुणे येथील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांशी  राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

              राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, क्रीडा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कोविड-19 मुळे अनेक अडचणी येत आहेत. कोविडच्या  पार्श्वभूमीवर  विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पुढे कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी संबंधित विभागांचे मंत्री, राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांनीही कोविड काळात काळजी घ्यावी आणि कोविडच्या  सर्व नियमांचे पालन करावे,असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com