fbpx
Solapur City News

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

विभागात कोरोना बाधित 4 लाख 15 हजार  914 रुग्ण

पुणे- पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  75  हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 903  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2  लाख  73  हजार 12  रुग्णांपैकी  2  लाख 24  हजार 582  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  42 हजार 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 6  हजार 109  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  82.26  टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 34  हजार 609  रुग्णांपैकी 25 हजार 1  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 60  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31  हजार 812  रुग्णांपैकी  23  हजार 660  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7  हजार  40  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 112  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 33  हजार 447  रुग्णांपैकी 23  हजार  921  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार 267 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 259  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update