Nagpur Flood 6 750x375 1
Environment Health Maharashtra Maharashtra Gov

बीणानदी पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर-  जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काल 25 गावाला पुराचा विळखा पडला होता. आज सकाळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी ठाकरे यांच्यासह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान तालुक्यात पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांची मोठी हानी झाल्याचे दिसून आले. पूरग्रस्त कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचे  तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश  संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            खापरखेडा तालुक्यातील बीणानदीमुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे, पारशिवणी तालुक्यातील सिंगारदीप या नदीतील पुराच्या पाण्यामुळे शेतातील पिकांची हानी झालेली आहे तसेच मौदा तालुक्यातील कन्हान नदीला आलेल्या पुरात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मौदा तालुक्यातील 18 गावे पुरामुळे बाधित झाले असून  1158 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. साधारणत 6186 हेक्टर अंदाजे शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मौदा तहसिलदार प्रशांत सांगाडे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना  दिली.

         पालकमंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांची विचारणा करून त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती, घरे व संसारपयोगी वस्तू यांचे तातडीने पंचनामे करुन प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com