Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
भंडारा- भिमलकसा प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे येवा प्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भिमलकसा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. भिमलकसा तलावात गाळ मोठ्या प्रमाणात साचला असून यांत्रिकी विभागाद्वारे तलावाचे खोलीकरण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला केल्या. त्याचप्रमाणे कालवा दुरुस्ती करून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा असे त्यांनी सांगितले.
निधीच्या उपलब्धतेनुसार सर्व कामांचे टप्प्याटप्प्याने नियोजन करावे असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. या विकास कामांचा नियमित अहवाल सादर करावा असेही ते म्हणाले. भिमलकसा येथे पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर वाव आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन आवश्यक असून यासाठीचा आराखडा तयार करून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. यावेळी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.