Adhava Meeting2
Economy Maharashtra Solapur City

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून उजनी पाईपलाईनचे काम गतीने करा- पालकमंत्री भरणे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतची वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या. सोलापूर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून आणखी एक 110 किमी लांबीची पाईपलाईन मंजूर झाली आहे. ही पाईपलाईन संपूर्ण जमिनीखालून असणार आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत भरणे यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  त्रिंबक ढेंगळे-पाटील, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह स्मार्ट सिटीचे संबंधित सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

              पाईपलाईनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईन जमिनीखालून असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही. त्यांना त्या जमिनीवर सर्व पिके घेता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी अडवणूक करू नये. पाईपलाईन माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून जात असून यात 35 गावांचा समावेश आहे. 138 हेक्टरच्या वापर हक्कासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. 35 पैकी 34 गावातील मोजणीचे कामही झाले आहे. बाधित जमिनीवरील वृक्ष, शेती, घरे यांचे पंचनामे व मूल्यांकन करण्याचे काम त्वरित सुरू होत असल्याची माहिती  सूर्यवंशी यांनी दिली.

            सोलापूर महापालिकेने फेब्रुवारी 2020 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असून त्यानुसार शासनाकडून वापर हक्काच्या संपादनाचा इरादा राजपत्राद्वारे प्रसिद्ध होणे बाकी आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या 21 दिवसात बाधित खातेदारांच्या लेखी हरकती घेऊन 30 दिवसात हरकतीवर सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे. यावेळी स्मार्ट सिटीचे श्री. ढेंगळे -पाटील यांनी पाईपलाईनबाबतच्या अडचणी मांडल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील उड्डाणपूल, स्ट्रीट लाईट, आयलँड, ई-टॉयलेट, हुतात्मा बाग, कचरा ट्रान्सफर स्टेशन, होम मैदान, डिपार्टमेंट गार्डन, इंदिरा गांधी स्टेडिअम, सिद्धेश्वर तलावाभोवती ट्रॅकिंग, लक्ष्मी मार्केट, सोलर सिस्टीम आदी कामांचाही आढावा घेण्यात आला. ही कामेही गतीने करण्याच्या सूचना  भरणे यांनी दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

Sidd

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com