fbpx
images 1 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कोरोना व गणेश विसर्जनाची आढावा बैठक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

शिर्डी-  संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व शांतता कमिटीने केलेल्या उपाययोजनांचा आढावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला.

            अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून झालेल्या बैठकीस आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ.दुर्गा तांबे, अ‍ॅड. आर.बी.सोनवणे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुका व शहरातील कोरोना संक्रमणाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना तसेच गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली. याचा आढावा घेऊन मंत्रीमहोदयांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

                याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात व तालुक्यात कोरोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र त्याला नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. हा आरोग्यविषयक संकटांचा काळ असून या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील धामधुमीचा उत्सव असतो, मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यावर काहीसे विरजण पडले आहे. उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांनी नगरपालिकेने निर्माण केलेल्या संकलन केंद्रावर आपल्या घरातील गणेश मूर्ती व सामुहिक गणेश मूर्ती जमा कराव्यात. नदीकाठी कोणीही गर्दी करू नये, पाण्याचा वाढता प्रवाह धोकादायक असून कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये. प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणीच गणेश मूर्ती व निर्माल्य यांचे संकलन करावे. गर्दी टाळणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट्ट असून त्यामुळे कोरोनाची साखळी वाढण्यापासून आपण रोखू शकतो, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच प्रशासनानेही या काळात सतर्क राहावे, अशा सूचना मंत्रीमहोदयांनी दिल्या. आ. डॉ.तांबे म्हणाले, गणेशोत्सव हा प्रत्येकाचा आनंदाचा उत्सव असतो. सर्वांनी गणेश उत्सव साध्या पद्धतीने घरात साजरा केला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करत नगरपालिकेने निर्माण केलेल्या तलावात व संकलन केंद्रात आपले गणपती जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

             नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे म्हणाल्या, गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे की नदीकाठी कोणीही जाऊ नये, गर्दी करू नये, आपली गणेश मूर्ती जवळच्या संकलन केंद्रावर जमा करावी व प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील परिस्थितीचा माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मंत्रीमहोदयांना दिली. कोविड केअर सेंटरमधील नागरिकांची स्थिती, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कोरोना व गणेश विसर्जनाची आढावा बैठक

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update