Maharashtra State Development Loan 696x364 1
Economy

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ अंतर्गत एक हजार कोटी रूपयांच्या रोख्यांची विक्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे  चार  वर्ष मुदतीच्या एकूण एक हजार  कोटी   रुपयांचे रोखे विक्रीची  सूचना दिली आहे. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील. तसेच राज्य शासनाच्या क्र. एलएनएफ. १०.२५/प्र.क्र. १०/ अर्थोपायी दिनांक १६ में, २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या अटींचे अधीन राहील.

कर्जाचा उद्देश या कर्जाद्वारे मिळालेल्या  रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद  293 (3) अन्वये कर्ज उभारणास केंद शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. कार्यप्रणाली  शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बैंक,  मुंबई द्वारे  दिनांक 16  मे, २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र एलएनएफ १० १९/प्र.क्र १० अर्थोपाय, परिच्छेद  ६.१ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

        अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान-राज्य शासनाच्या सर्व  साधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ. १०.  १९ /प्र क्र . अर्थोपाय, दिनांक १६, में, २०१९ मधील अस्पर्धात्मक लिलाव  पद्धतीनुसार (सुधारित) एका अधिसूचित केलेल्या  शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना  वाटप करण्यात यईल. मात्र एका गुंतवणुकदारास  एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त 1 टक्का रक्कमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

लिलावाचा दिनांक व ठिकाण,–भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फ दिनांक ०८ सप्टेंबर , २०२० रोजी  त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात  लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस  दिनांक:०८ सप्टेंबर, २०२० रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार  , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन   (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत. (अ)स्पर्धात्मक   बिडर्स संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक  ऑफ़ इंडिया, कोअर बँकींग  सोल्युशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११ .३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत. (ब) अस्पर्धात्मक बिडस् संगणक प्रणालीदारे, रिझर्व्ह बैंक  ऑफ इंडिया, कोअर बँकीग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार

सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत

            लिलावाचा निकाल,-लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक ,मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच  दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रक्कमेचे प्रदान दिनांक ०९ सप्टेंबर, २०२० रोजी करण्यात येईल. अधिदानाची  कार्यपद्धती यशस्वी  झालेल्या बिडर्सकडून दिनांक ०९ सप्टेंबर , २०२० रोजी रिझर्व्ह बँक   ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात  रोखीने, बैंकर्स  धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा  त्याच्या  रिझर्व्ह बॅंक  ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय   असलेले धनादेश बँकेची  कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी  अधिदानाने प्रदान करण्यात येईल कर्जरोख्याचा  कालावधी चार  वर्षांचा असेल रोख्याचा  कालावधी हा दिनांक  9 सप्टेंबर, २०२० रोजीपासून सुरू होईल.

             परतफेडीचा दिनांक -दिनांक 9 सप्टेंबर, 2024  रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात यईल. व्याजाचा दर अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा  कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक 9 मार्च आणि 9 सप्टेंबर रोजी सहामाही पध्दतीने करण्यात येईल. कर्जरोख्याची पात्रता शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकीग  विनियम अधिनियम, 1949  खालील कलम  २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता   गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल, कर्जरोखे हे पुन: विक्री खरेदीसाठी अनुज्ञेय असतील. अशी माहिती  वित्त विभागाच्या 3 सप्टेंबर 2020  च्या अधिसूचनमध्ये नमूद करण्यात  आली  आहे.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com