Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
अमरावती- हिशेब न आल्याने कष्टकरी भगिनीची कुणीही खिल्ली उडवू नये. त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर व सन्मान केला पाहिजे. कष्टकरी भगिनींना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. एका कष्टकरी महिलेला हिशेब येत नसल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माताभगिनींची थट्टा होता कामा नये. याकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. महिला व बालविकास विभागातर्फे महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी राज्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यालाच जोडून असंघटित क्षेत्रातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनासह साक्षरता कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
#solapurcitynews
जाहिरात-
(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)
जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143