Cyber Crime new 750x375 1 750x375 1
Business Covid 19 Economy International Job

‘महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी

Cyber Crime new 750x375 1 750x375 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा ● Youtube वर सबस्क्राईब करून अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

  • इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही.  (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)
  • महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
  • महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.
  • कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत.

असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

#solapurcitynews

advt 724x1024 1

 

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com