20200814 091930
Crime Solapur City

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

सोलापूर शहरउपाध्यक्षपदी पत्रकार शिवाजी सावंत व जलकन्या भक्तीताई जाधव यांची निवड

 

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर/प्रतिनिधी- माहिती अधिकार व पञकार संरक्षण समिती सोलापूर शहर अध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष दिपक कांबळे यांच्या आदेशाने गुरुवारी शासकीय विश्वामगृह येथे सोलापूर शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली. या वेळी पञकारांच्या अडचणीवर पञकारावर होणारे हल्ले व इतर प्रश्नावर देखील चर्चा करुन शासन दरबारी प्रश्न मांडून सोडवण्याचा पर्यंत करण्याचा निर्धार या मीटिंगमध्ये घेण्यात आले. तसेच परिसरामध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार, होत असलेला भ्रष्टाचार याला कुठेतरी मूठमाती देता यावी यासाठी या संघटनेची निर्मिती करण्यात आल्याची माहिती शहरअध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांनी सांगितले. त्यानंतर एकूण सोलापूर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये युवा पत्रकार शिवाजी सावंत यांना सोलापूर शहर उपाध्यक्ष पद देण्यात आले.तसेच नियुक्तीपत्र भोसले यांनी दिले. कार्यअध्यक्ष आकाश सोमा, उपअध्यक्ष शिवाजी सावंत, जलकन्या भक्ती ताई जाधव, सचिव मोहन गुंडला, अरविंद अकेन,दिलीप शिंदे,सुमित शिंदे असे एकुण 27 सदस्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आले. या वेळी पञकार सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com