Minister Shri Vadettiwar Photo 750x375 1
Economy National Technology

मुंबईतील जीर्णावस्थेतील इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- सर करीमभाई इब्राहिम ट्रस्ट या निर्वासित मालमत्तेमधील कुलाबा चेंबर्स आणि मेहबूब इमारत या दोन्ही इमारतींची अवस्था जीर्ण असून, तातडीने या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे. इमारत पुनर्बांधणीसाठी  सल्लागार नेमून अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयात मुंबई शहरातील सर करीमभाई इब्राहिम ट्रस्टच्या निर्वासित झालेल्या पाच इमारती व डोसा बिल्डींग या इमारतीतींल रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले.

           मंत्री वडेट्टीवार म्हणाले, रहिवाशांचे प्राण धोक्यात येऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे. या संबंधित इमारतींमधील व्यावसायिक आणि रहिवासी यांचे  पुनर्वसन करताना नियमानुसार जागा देण्यात यावी. तसेच, कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने राबवावी. कुलाबा येथील कुलाबा चेंबर्स, करीमभाई मॅनॉर, मोहम्मदभॉय मॅन्शन, मेहमुद बिल्डींग, माहिम मॅन्शन आणि डोंगरी येथील डोसा बिल्डींग या इमारतीतील रहिवाश्यांना सोसायटी तयार करून द्यावी व सल्लागार नेमून तातडीने पुढील कार्यवाही करण्यात यावी. संबंधित कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

            बैठकीस मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, तहसिलदार तथा व्यवस्थापकिय अधिकारी आशा शेंडगे, म्हाडाचे कार्यासन अधिकारी एस.एम.अहिरराव, कार्यकारी अभियंता एस.व्ही. वारर्डे आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com