Tourism1 750x375 1
Maharashtra Maharashtra Gov National

मुंबई पालिका मुख्यालयातील पुरातन वास्तू पाहणीबाबत महापालिका आणि एमटीडीसीमध्ये करार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला.

Tourism

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचे स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचेही एक वेगळे महत्त्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जुन पहावी अशी ही वास्तू आहे. मुंबईला 24 तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे, असे ते म्हणाले. मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता 70 वरुन फक्त 9 या एकअंकी संख्येवर आणली आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com