fbpx
Minister Gulabrao Patil.jpg 2 750x375 1 म्हणून या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बडा पोखरण, धाकटी डहाणू, केळवे-माहीम, उंबरपाडा व नंदाळे परिसरातील गावांना होणार फायदा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई- पालघर जिल्ह्यातील बडा पोखरण, धाकटी डहाणू परिसरातील 30 गावे, केळवे-माहीम परिसरातील 20 गावे उंबरपाडा व नंदाळे परिसरातील 32 गावे अशा एकूण 82 गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना संदर्भात आज मंत्रालयात मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

बडा पोखरण व 29 गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजना

             बडा पोखरण 29 गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम 90% पूर्ण झाले आहे. सतत फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे तसेच देखभाल व दुरुस्ती अभावी शेवटच्या टोकाकडील गावांना पाणीपुरवठा होत नाही. देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना जिल्हा परिषद, पालघर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. धाकटी डहाणू गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चंडी गावापासून स्वतंत्र पाईपलाईन किंवा डहाणू नगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाईप लाईन टाकणे यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करावा, असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्र्यांनी यावेळी दिले.

केळवे-माहीम व 18 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना

केळवे-माहीम व 18 गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सध्या पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच जलवाहिन्या तसेच कमी क्षमतेच्या वितरण वाहिन्यांमुळे पुरेसे पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन जल जीवन मिशनच्या धोरणानुसार केळवे-माहीम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रक व आराखडे दरडोई 55 लिटरप्रमाणे तयार करून एक महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

वाढीव उंबरपाडा नंदाडे व 32 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

पालघर जिल्ह्यातील उंबरपाडा नंदाडे व 17 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संयुक्त समितीमार्फत राबविण्यात येत आहे.ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी केली.  करवाळे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच या भागातील लोकसंख्येचे नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे नवीन योजनेची आवश्यकता होती. त्यामुळे खडकोली बंधाऱ्यातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश पाणीपुरवठामंत्री श्री. पाटील यांनी दिले. मोखाडा तालुक्यातील  चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद आहेत. ती त्वरित सुरू करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

              यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, राजेशभाई शहा, सुभाष भुजबळ ,मुख्य अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे  व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 म्हणून या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update