fbpx
unnamed यापुढे शेतजमिनींना तारेचे व जाळीचे कुंपण उभे करण्यास वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा  अपडेट राहा

मुंबई- महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 च्या कलम 22 (अ) अंतर्गत पुनर्स्थापित शेतजमिनींना तारेचे व जाळीचे कुंपण उभे करण्यास वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

               खाजगी वन म्हणून संपादित केलेले क्षेत्र संबंधित खातेदारास त्याच्या उपजीविकेसाठी महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 च्या कलम 22 (अ) अंतर्गत पुनर्स्थापित करण्याची तरतूद आहे. सदर क्षेत्रावर शेतीविषयक कामे करण्यास कोणतेही बंधन नव्हते. मात्र अशा जमिनीचा अकृषक व वनेतर वापर करावयाचा झाल्यास वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. शेत पिके व शेतातील झाडोरा यांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून  वन अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा होत होती.त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहितीही मंत्री राठोड यांनी दिली.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010 यापुढे शेतजमिनींना तारेचे व जाळीचे कुंपण उभे करण्यास वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update