fbpx
43b92bbe 4635 4bb0 b7f9 cadc106c2937 Ratnagiri railway

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाण हद्दीमध्ये घर बांधण्यासाठी असलेल्या निकषांचा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आज आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले, गावठाणातील दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या वाढवून ३ हजार करण्यात यावी. या गावातील  १५० चौकिमी क्षेत्रापर्यंतच्या भूखंडावरील रहिवास वापराच्या बांधकाम परवानगीसाठी वास्तूविशारद किंवा अभियंता यांची आवश्यकता नसेल. तसेच बांधकाम परवानगी देण्यापूर्वी लागू असलेल्या सर्व नियमांची खातरजमा नियोजन प्राधिकरणाने करणे आवश्यक राहील. नगरविकास विभागाने प्रचलित विकास नियंत्रण नियमावली विचारात घेऊन बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असेल. गावठाणातील काही अधिकार ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आले आहेत, असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update