Maharashtra Maharashtra Gov National Solapur City

या प्रमुख मागणीसाठी सोलापूरात “ढोल बजावो” आंदोलन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा तसेच एसटीचा दाखला द्यावा या प्रमुख मागण्यासाठी सोलापूरात धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने ढोल बजावो सरकार जागावो आंदोलन करण्यात आले. शासनाने आता वेळीच जागे होवून तात्काळ एसटी आरक्षणाची अमंलबजावणी करावी अन्यथा हा आरक्षण लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अर्जून सलगर यांनी दिली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे अर्थात एसटीचे आरक्षण मिळावे तसेच अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुन ही शासन याची दखल घेत नाही.त्यामुळे शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी आ.गोपीचंद पडळकर यांच्या आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यात ढोल बाजावो सरकार जगावो हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मेंढपाळ कुठुंबासाठी अर्धबंदिस्थ, बंदीस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेतंर्गत स्वतंत्र योजना सुरु करावी, ग्रामीण भागातील कुठुंबाला पहिल्या टप्यात 10 हजार घरकुलांचा लाभ देण्यात यावा, स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संस्थेमार्फत मदत करण्यात यावी, शहराच्या प्रमुख ठिकाणी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वस्तीगृहे बांधावित.तसेच मेंढपाळ कुठुंबाना जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान द्यावे अशा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
शुक्रवारी सकाळी हुतात्मा चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हे आंदोलन सुरु करण्यात  आले. यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असणारे पारंपारिक गजी ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शरणु हांडे, सतिश बुजरुक्के, श्रीधर सोनटकले, धनराज जानकर, राम वाकसे, शिवानंद पुजारी, लक्ष्मण तरंगे, अप्पा नरे, शंकर बंडगर, सागर सुरवसे अर्जून सलगर, सिध्दारुगढ बेडगनूर, विलास पाटील,  निर्मताई पाटील, निमिशा वाघमोडे, यलगोंडा सातपुते,बीपीन पाटील, सुधीर सलगर, शिवा पुजारी, सोपान खांडेकर, शेखर बंगाळे, यतिराज होनमाने, युवराज जानकर, केदार पुजारी, शिवराया हांडे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com